Lakh ko 50 - Maharashtra

जागतिक "MOVE" शिखर परिषदेमध्ये मा. पंतप्रधानांनी असे विधान केले होते - "सार्वजनिक वाहतूक हा आपल्या वाहतूकविषयक उपक्रमांचा आधारस्तंभ असला पाहिजे." त्याबरोबरच त्यांनी ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया आणि दिव्यांगांसह समाजाच्या सर्व घटकांना वापरता येण्यासारख्या, आणि सुरक्षित, परवडणार्‍या वाहतुकीच्या सोयी असण्यावर भर दिला होता.

आम्ही त्यांच्याशी १००% सहमत आहोत! आणि आपल्या शहरांमध्ये भरपूर बसेस असल्या तरच हे शक्य होईल. महाराष्ट्रामध्ये २७ महानगरपालिका आहेत. पण मुंबई (आणि काही प्रमाणात पुणे) वगळता कोणत्याही शहरात नाव घेण्यासारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. आपली शहरं सळसळती राहावीत, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाने गुदमरून जाऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल, तर या, आपण एका सुरात भरपूर बसेसची मागणी करू या. म्हणजे किती? एक लाख लोकसंख्येमागे ५० बसेस - "लाख को ५०!"

चला तर, व्हा ह्या मोहिमेत सामील!

The Hon'ble Prime Minister Shri Narendra Modi said at the Global MOVE summit that, “public transport must be the cornerstone of our mobility initiatives” and emphasized the need for mobility that is “safe, affordable and accessible for all sections of society which includes the elderly, the women and the specially abled”.

We couldn't agree more! And for this to happen, we need more buses in our cities. Maharashtra has 27 large cities (>3 lakh population) but other than Mumbai and Pune to some extent, there is no public transport to speak of.

If cities are to thrive and avoid congestion and pollution, we need to come together and demand more buses. At least 50 per lakh people – “Lakh ko 50”.
Come join the campaign!

Find your local campaign

Your Location

10,243
of 15,000 signatures
across 2 local campaigns

Campaigns (2)

 • Cities in Maharashtra need 'Lakh ko 50' buses, NOW!
  We need more buses for our city! We are college students, office goers, factory workers, domestic helps, service providers, school children, housewives, caregivers, . . . We rely on buses to get to work, school, office, factory. But the public bus system in our city is really bad. We are tired of waiting endlessly, traveling in a crowded uncomfortable bus, day in and day out. Some women think twice before accepting a job that’s far from home, worried about their safety in overcrowded buses. College girls feel the same. When we travel in buses we pollute less, occupy less road space and don’t add to the congestion on the roads. We deserve a reliable, affordable, safe and comfortable bus ride. Some of us travel using our own two-wheeler or car. We would like to, but we just can’t use the bus. It is not reliable, it takes too long, it’s too crowded and the routes are not convenient. There is no last-mile connectivity. Instead we end up spending a lot on our vehicles. Plus the stress of driving and the fear of being in an accident. I know it would be better for us and the city if we use a bus. We want a reliable, affordable, safe and comfortable bus service. Half the population of Maharashtra lives in cities. These are the cities that drive the economy of the state. We help to run this “economic engine”. But these cities are congested and polluted. One of the reasons is that we just don’t have good public transport - starting with the number of buses. They say a city should have at least 50 buses per lakh residents. “Lakh ko 50”. The sad situation in Maharashtra is shown in the video below. https://www.youtube.com/watch?v=qE7-5w1nmTE Enough! We want you to strengthen public transport as a part of Mission Begin Again – make our bus commute comfortable, convenient, affordable and safe – help revive the economy and create healthy cities for healthy people. We the urban residents of Maharashtra demand that the State take responsibility and action · Make provision of bus service mandatory for cities · Announce a financial package to get enough buses running
  2,649 of 3,000 Signatures
  Created by Parisar Pune Picture
 • महाराष्ट्रातल्या शहरांना हव्यात "लाखामागे ५०" बसेस - तातडीने!
  आम्हांला आमच्या शहरात अजून भरपूर बसेस हव्या आहेत! आम्ही शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन/औद्योगिक कर्मचारी, घरकाम करणारी/करणारा कर्मचारी, गृहिणी, वैद्यकीय सेवक, असे सामान्य नागरिक आहोत. आमच्यापैकी बहुतेकजण कार अथवा दुचाकीने प्रवास करत नाही. आम्ही आमच्या येण्या-जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहोत. आमच्या शहरातली सार्वजनिक वाहतूक अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक वाहतुकीची चांगली सोय नसल्याने कित्येकांना, विशेषत: महिलांना, घरापासून दूर असलेल्या ठिकाणी नोकरीचा विचार देखील करता येत नाही. बसची वाट पाहणे, अत्यंत वाईट अवस्थेतील बसमध्ये गर्दीतून प्रवास करणे ह्या सगळ्याचा आम्हांला अत्यंत उबग आला आहे. ह्या सगळ्यात स्त्रियांना होणारे त्रास तर वेगळेच! आम्ही शक्यतो खाजगी वाहन घेण्याचं टाळत आहोत. आम्हांला आमच्या शहराच्या वाहतूक कोंडीत आणि प्रदूषणात भर घालायची नाही. आम्ही बसने प्रवास करतो, तेव्हा आम्ही आमच्या शहराचं प्रदूषण आणि कोंडी कमी करायला हातभार लावतो, ह्याचा आम्हांला अभिमान आहे. पण त्याबदल्यात आम्हांला शहराकडून काय मिळतं, तर फक्त आणि फक्त त्रास! हो, आमच्यापैकी काहीजण कार / दुचाकीने प्रवास करतात; पण ते आम्हांला अजिबात आवडत नाही. वाहतूक कोंडीतून वाहन चालवताना येणारा ताण, अपघाताची भीती, वाहनावर करायला लागणारा खर्च हे सगळं आम्हांला नकोय. पण आमच्या शहरातली बस सेवा अत्यंत टुकार आहे. बस वेळेवर येत नाही, आलीच तर गर्दीमुळे चढता येत नाही, आलंच तर बस वाहतूक कोंडीत अडकते. तिच्या सीट फाटलेल्या असतात आणि छप्पर गळत असतं. हे काय आहे?? आम्हांला खाजगी वाहन वापरून आमच्या शहराच्या प्रदूषण आणि कोंडीत भर टाकायची अजिबात हौस नाही. आम्हांला विश्वासार्ह, परवडणारी, सुरक्षित आणि सुखकर बस सेवा मिळालीच पाहिजे. तो हक्क आहे आमचा! आपल्या राज्यातली अर्धीअधिक जनता शहरांमध्ये राहते. "शहरं आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत" म्हणता आपण. आम्ही ह्या कण्याचाच भाग आहोत, आणि त्याचा अभिमान आहे आम्हांला. पण ही अशी सार्वजनिक बस असेल तर हा कणा कोंडीमुळे आणि प्रदूषणामुळे मोडेल लवकरच! आपल्या बस सेवा इतक्या वाईट का? त्याची सुरुवात बसेसच्या अपुर्‍या संख्येपासून होते. शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेस असाव्यात असं तज्ज्ञ म्हणतात. "लाख को ५०"! पण आपल्या महाराष्ट्राची अवस्था आज अशी झाली आहे- https://www.youtube.com/watch?v=11q0q-gHr-8 हे आता बास झालं! "Mission Begin Again" सुरू झालंय. पण आम्ही सुखरूप कामावर जावं असं आपल्याला वाटत असेल, तर कोरोनाविरोधी लढ्याच्या ह्या टप्प्याचा भाग म्हणून आम्हांला भरपूर बसेस द्या. विश्वासार्ह, परवडणार्‍या, सुरक्षित आणि सुखकर. आम्ही कामावर सुखरूप आणि वेळेवर पोचलो, तरच आपली अर्थव्यवस्था लवकर पूर्ववत होईल; तसंच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी झालं तरच आपली शहरं निरोगी राहतील. म्हणून आम्ही, महाराष्ट्रातले शहरी रहिवासी, अशी मागणी करतो, की राज्य सरकारने खालील गोष्टींची जबाबदारी घ्यावी- १) शहरांनी कायमस्वरूपी उत्तम, दर्जेदार बस व्यवस्था पुरवली पाहिजे २) त्यासाठी आवश्यक तेवढ्या बसेस चालवण्यासाठी राज्य सरकारने एक आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे.
  7,594 of 8,000 Signatures
  Created by Parisar Pune Picture