Skip to main content

To: श्री. उद्धवजी ठाकरे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्रातल्या शहरांना हव्यात "लाखामागे ५०" बसेस - तातडीने!

महाराष्ट्रातल्या शहरांना हव्यात "लाखामागे ५०" बसेस - तातडीने!

१) शहरांनी कायमस्वरूपी उत्तम, दर्जेदार बस व्यवस्था पुरवली पाहिजे
२) त्यासाठी आवश्यक तेवढ्या बसेस चालवण्यासाठी राज्य सरकारने एक आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे.

Why is this important?

आम्हांला आमच्या शहरात अजून भरपूर बसेस हव्या आहेत!

आम्ही शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयीन/औद्योगिक कर्मचारी, घरकाम करणारी/करणारा कर्मचारी, गृहिणी, वैद्यकीय सेवक, असे सामान्य नागरिक आहोत. आमच्यापैकी बहुतेकजण कार अथवा दुचाकीने प्रवास करत नाही. आम्ही आमच्या येण्या-जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहोत. आमच्या शहरातली सार्वजनिक वाहतूक अत्यंत वाईट आहे. सार्वजनिक वाहतुकीची चांगली सोय नसल्याने कित्येकांना, विशेषत: महिलांना, घरापासून दूर असलेल्या ठिकाणी नोकरीचा विचार देखील करता येत नाही. बसची वाट पाहणे, अत्यंत वाईट अवस्थेतील बसमध्ये गर्दीतून प्रवास करणे ह्या सगळ्याचा आम्हांला अत्यंत उबग आला आहे. ह्या सगळ्यात स्त्रियांना होणारे त्रास तर वेगळेच!

आम्ही शक्यतो खाजगी वाहन घेण्याचं टाळत आहोत. आम्हांला आमच्या शहराच्या वाहतूक कोंडीत आणि प्रदूषणात भर घालायची नाही. आम्ही बसने प्रवास करतो, तेव्हा आम्ही आमच्या शहराचं प्रदूषण आणि कोंडी कमी करायला हातभार लावतो, ह्याचा आम्हांला अभिमान आहे. पण त्याबदल्यात आम्हांला शहराकडून काय मिळतं, तर फक्त आणि फक्त त्रास!

हो, आमच्यापैकी काहीजण कार / दुचाकीने प्रवास करतात; पण ते आम्हांला अजिबात आवडत नाही. वाहतूक कोंडीतून वाहन चालवताना येणारा ताण, अपघाताची भीती, वाहनावर करायला लागणारा खर्च हे सगळं आम्हांला नकोय. पण आमच्या शहरातली बस सेवा अत्यंत टुकार आहे. बस वेळेवर येत नाही, आलीच तर गर्दीमुळे चढता येत नाही, आलंच तर बस वाहतूक कोंडीत अडकते. तिच्या सीट फाटलेल्या असतात आणि छप्पर गळत असतं. हे काय आहे??

आम्हांला खाजगी वाहन वापरून आमच्या शहराच्या प्रदूषण आणि कोंडीत भर टाकायची अजिबात हौस नाही. आम्हांला विश्वासार्ह, परवडणारी, सुरक्षित आणि सुखकर बस सेवा मिळालीच पाहिजे. तो हक्क आहे आमचा!

आपल्या राज्यातली अर्धीअधिक जनता शहरांमध्ये राहते. "शहरं आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत" म्हणता आपण. आम्ही ह्या कण्याचाच भाग आहोत, आणि त्याचा अभिमान आहे आम्हांला. पण ही अशी सार्वजनिक बस असेल तर हा कणा कोंडीमुळे आणि प्रदूषणामुळे मोडेल लवकरच!

आपल्या बस सेवा इतक्या वाईट का? त्याची सुरुवात बसेसच्या अपुर्‍या संख्येपासून होते. शहरांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेस असाव्यात असं तज्ज्ञ म्हणतात. "लाख को ५०"! पण आपल्या महाराष्ट्राची अवस्था आज अशी झाली आहे-

https://www.youtube.com/watch?v=11q0q-gHr-8

हे आता बास झालं!
"Mission Begin Again" सुरू झालंय. पण आम्ही सुखरूप कामावर जावं असं आपल्याला वाटत असेल, तर कोरोनाविरोधी लढ्याच्या ह्या टप्प्याचा भाग म्हणून आम्हांला भरपूर बसेस द्या. विश्वासार्ह, परवडणार्‍या, सुरक्षित आणि सुखकर. आम्ही कामावर सुखरूप आणि वेळेवर पोचलो, तरच आपली अर्थव्यवस्था लवकर पूर्ववत होईल; तसंच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी झालं तरच आपली शहरं निरोगी राहतील.
म्हणून आम्ही, महाराष्ट्रातले शहरी रहिवासी, अशी मागणी करतो, की राज्य सरकारने खालील गोष्टींची जबाबदारी घ्यावी-
१) शहरांनी कायमस्वरूपी उत्तम, दर्जेदार बस व्यवस्था पुरवली पाहिजे
२) त्यासाठी आवश्यक तेवढ्या बसेस चालवण्यासाठी राज्य सरकारने एक आर्थिक पॅकेज जाहीर केलं पाहिजे.

Maharashtra, India

Maps © Stamen; Data © OSM and contributors, ODbL


Reasons for signing

  • No need for unnecessary, destructive, expensive projects like Metro & HCMTR. #ScrapHCMTR #RevampMSRTC #RevampBEST #RevampPMPML
  • Bus is very important.
  • Because in this pandemic we need safe and well transportation

Updates

2020-08-04 21:04:11 +0530

100 signatures reached

2020-08-04 15:47:46 +0530

50 signatures reached

2020-08-04 14:48:37 +0530

25 signatures reached

2020-07-27 10:02:26 +0530

10 signatures reached