Skip to main content

To: दीपक तावरे - सोलापूर महानगरपालिका आयुक्त

सोलापूर शहरातील कचरा जाळण्याच्या घटनांना त्वरित आळा घाला.

सोलापूर शहरातील कचरा जाळण्याच्या घटनांना त्वरित आळा घाला.

1. कचरा जाळणाच्या घटनांवर दंडात्मक कारवाई करावी.
2. कचरा जाळण्याच्या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी कचरा व्यवस्थापनाच्या सुधारित कार्यपद्धती तयार कराव्यात.

Why is this important?

सोलापूर हे तुलनेने महाराष्ट्रीतील इतर शहरांपेक्षा लहान आणि कमी लोकसंख्येचे शहर आहे. त्यामुळे वाढत्या रहदारीमुळे आणि बांधकामाशी निगडित कामांमुळे होणारे प्रदूषण या शहरात कमी आहे, पण तरीही या शहराचा Air Quality Index अनेकवेळा १०० च्या वर असतो. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनंतर असे लक्षात आले कि सोलापूर शहरात घरगुती कचरा व्यवस्थापन जरी चांगले असले तरी झाडांचा पालापाचोळा (Garden Waste) सर्रास जाळला जातो. यामुळे शहरातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो.

झाडांचा पालापाचोळा जाळला जाताना बहुतेक वेळा त्याच्या आजूबाजूला असलेले प्लास्टिक, रबर अशा गोष्टी सुद्धा जाळल्या जातात. या जैविक आणि अजैविक कचऱ्याच्या मिश्रणातून विषारी धूर बाहेर पडतो. हा धूर श्वसनातून शरीरात गेल्यावर घातक ठरू शकतो. हा कचरा निवासी भागांच्या जवळ जाळला जात असल्याने धुराचा लहान बालके,आणि वयस्कर नागरिकांना त्रास होतो. सातत्याने कचरा जाळल्याने कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता असते. दम्याच्या रुग्णांना याचा सार्वधिक त्रास होऊ शकतो.

साथीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना वयोवृद्ध तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या नागरीकांना या आजारांची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याची बाब समोर आली आहे. अशावेळी मानवी वस्तीच्या जवळ जाळला जाणारा हा कचरा घातक ठरू शकतो.

सोलापूर महानगरपालिकेने या बाबीची त्वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे कचरा जाळण्याच्या या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी कचरा व्यवस्थापनाच्या सुधारित कार्यपद्धती तयार कराव्यात.

Solapur, Maharashtra, India

Maps © Stamen; Data © OSM and contributors, ODbL


Reasons for signing

  • To totally stop garbage burning.
  • To stop the garbage burning in solapur and control the air pollution.

Updates

2020-03-26 11:27:42 +0530

10 signatures reached