Skip to main content

To: आदित्य ठाकरे - पर्यावरण मंत्री , उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री , राजेश टोपे - आरोग्य मंत्री

लॉकडाऊनच्या काळात पालापाचोळा जाळण्याच्या घटनांना आळा घाला; Stop garbage burning in Maharashtra.

लॉकडाऊनच्या काळात पालापाचोळा जाळण्याच्या घटनांना आळा घाला; Stop garbage burning in Maharashtra.

१. लॉकडाऊनच्या काळात कचरा/पाला-पाचोळा जाळणाऱ्या व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
२. पाला-पाचोळा जमा करण्यासाठी सगळ्या महानगरपालिकांना स्वतंत्र घंटा-गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात यावे.

Why is this important?

कोरोनाचा प्रसार लवकरात लवकर रोखण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉक डाऊनसुरु आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक केसेस असल्यामुळे 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहील. प्रधानमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सूचनांमध्ये आपली रोग प्रतिकारशक्ती (immunity) जपणे आणि वाढवणे याला प्राधान्य दिले गेले आहे. परंतु, उघड्यावर कचरा जाळल्याने त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्य क्षमतेवर पर्यायाने रोगप्रतिकारक क्षमतेवर होऊन आपले स्वास्थ्य निरोगी राहत नाही.

आजघडीला शहरी भागात उघड्यावर कचरा जाळण्याचे चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते आहे. आपल्याला माहित आहे कि उघड्यावर कचरा जाळल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होते. कोरोना हा श्वसनप्रक्रियेशी निगडीत आजार आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने अमेरिकेतील कोरोनाची लागण झालेल्या आणि त्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींचा data घेऊन केलेल्या अभ्यासात PM २.५ म्हणजे धूर आणि धुळीचे अतिसूक्ष्म कण ज्या ठिकाणी जास्त होते त्या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आढळून आले.[1] असाच अभ्यास इटलीतील मिलान शहरातील कोरोना (covid 19) लागण आणि मृत पावलेल्या व्यक्तींवर करण्यात आला. त्यातही वारंवार वायू प्रदूषणाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींमध्ये (prolong exposure to Air Pollution) मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आले.[2]

महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये कचरा आणि पालापाचोळा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. झटका डॉट ऑर्गला मिळालेल्या तक्रारींनुसार पुणे, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई अशा अनेक शहरांत एकाच ठिकाणी अनेक वर्ष कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. इतरही अनेक शहरात कचरा आणि पालापाचोळा जाळला जातो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात कुठेही कचरा किंवा पालापाचोळा जाळणे हा दंडात्मक गुन्हा असून त्यावर त्वरित कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. पण अजूनही अनेक महानगरपालिका या मुद्याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत.

उघड्यावर कचरा जाळला जाऊ नये याची खबरदारी घेत पाला-पाचोळा/ कचरा जमा करण्यासाठी सगळ्या महानगरपालिकांना त्वरित स्वतंत्र घंटा-गाड्या सोडण्याचे आदेश देण्यात यावे.

As India battles the Covid-19 pandemic, the national lockdown hopes to flatten the curve so normalcy ensues. However, as businesses and daily lives have erupted, civic issues are rearing their ugly head -- foremost of which is waste management. Several cities in Maharashtra mainly Solapur, Uran, Nashik, Pune have seen an upswing in garbage burning, which greatly jeopardizes the health of citizens. At a time when strong immunity and staying healthy is very important, the toxic fumes from burning garbage pose a great risk. Studies have linked Covid-19 deaths to compromised immunity (air pollution is a big factor) and we cannot be cautious enough.[1][2]

Municipal corporations need to crack down on the issue urgently.

[1] https://www.nytimes.com/2020/04/07/climate/air-pollution-coronavirus-covid.html
[2] https://www.ft.com/content/21f4ff6f-57ac-43cc-ae5b-602a127553de

https://www.youtube.com/watch?v=YVCAB7Z5nT0

Maharashtra, India

Maps © Stamen; Data © OSM and contributors, ODbL


Reasons for signing

  • To save mother earth

Updates

2020-05-06 17:31:21 +0530

10 signatures reached